दगडी गोटी उचलण्यात सौरभ गोळे विजयी

पिरंगुट- येथे आयोजित केलेल्या दगडी गोटी उचलून बैठका मारायच्या स्पर्धेत सौरभ अनिल गोळे याने ती ऐतिहासिक गोटी खांद्यावर घेऊन न थांबता 25 बैठका मारुन विजेतेपद मिळवले. त्याला हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे नाव कोरलेले मानाचे चांदीचे कडे देण्यात आले. लक्ष्मण कासार याने कडवी झुंज देत उपविजेतेपद पटकावले. एकूण 26 जण स्पर्धेत सहभागी झाले होते. मुळशी तालुक्‍यातील ऐतिहासिक अशा पिरंगुट गावातील दगडी गोटी उचलायची परंपरा 1670 पासून ते 1897 पर्यंत अविरतपणे सुरू होती. ती प्लेगच्या साथीत 1897मध्ये बंद झालेली मर्दानी खेळाची परंपरा यावर्षी होळीच्या दिवशी सुरू झाली.

यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते नितिन म्हाळसकर, गणेश जाधव, पोलीस पाटील स्वाती गोविंद गोळे, दुर्ग संवर्धन संस्था मावळ राजाभाऊ कुलकर्णी, सुमित चव्हाण, नितीन चव्हाण पाटील, विशाल शिंदे, विलास मोरे, राष्ट्रीय खेळाडू सचिन ढोरे, जुन्या पिढीतील नामांकित मल्ल लक्ष्मण गोळे, एकनाथ गोळे, दशरथ गोळे उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन समस्त ग्रामस्थ पिरंगुट, अखिल गोळे आळी मित्र मंडळ, सरनोबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)