निमसाखर- दगडवाडी (ता. इंदापूर) येथील श्री नंदिकेश्‍वराचे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. कळंब-बावडा या रस्त्यालगत दगडवाडी हद्दीतील पुरातन हेमाडपंथी असलेले हे श्री नंदिकेश्‍वर देवस्थानचे मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. नीरा नदी किनारी आणि परिसरातील वृक्षामुळे डोळ्यांचे पारणे फेडणारे असे निर्सगरम्य वातावरण असल्याने भाविकांनी दर्शनासोबतच पर्यटनाचाही आनंद लुटला. दरम्यान, आज (सोमवार) यात्रा होती त्यामुळे आदल्यादिवशी मंदिरात रात्री आकर्षक अशी फुलांची सजावट केली होती. याचबरोबर कळंब – बावडा रस्त्यापासून मंदिर भाग व मंदिरावरती विद्युत रोषणाई केल्याने या परिसराच्या सौंर्यात आणखीनच भर पडली होती. तर पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी केली होती. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचितप्रकार टाळण्यासाठी वालचंदनगर पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)