दगडफेक करत तरुणाला मारहाण

पिंपरी – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्‍याने तरुणाला इस्त्रीचे चटके देत मारहाण केली. तसेच आसपासच्या दुकानांवर दगडफेक केली. ही घटना काळेवाडी येथे घडली.

विशाल संपत बाबर (वय-24, रा. कैलासनगर, थेरगाव), प्रतीक अंतवन पवार (वय-19, रा. गुरुनानक नगर, थेरगाव), संतोष चोपडे ऊर्फ सिलप्पा, संतोष खलसे, विकी मंगवडे, संदीप पवार, मॉन्टी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोविंद बाळासाहेब भागवत (वय-26, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, केशवनगर, चिंचवड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आपसात संगनमत करून भागवत यांच्या लॉन्ड्रीवर आले. त्यांनी दगडफेक करीत भागवत यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर दगडाने मारहाण करीत आरोपी मंगवडे याने भागवत यांना इस्त्रीने चटके दिले. त्यानंतर आसपासच्या इतर दुकानांवरही दगडफेक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)