दगडफेक करणाऱ्यांना पकडण्यासाठी नवी शक्‍कल

जम्मू-काश्‍मीर पोलिसांचे कौतुक : सोशल मीडियावर फोटो व्हायरल
श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा बलांवर होणारी दगडफेक हा गंभीर विषय आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. या दगडफेक करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये पोलिसांनी आपलेच काही लोक पेरले आहेत, ज्यामुळे हल्लेखोरांना पकडणे सोपे जात आहे. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर नेटीझन्स पोलिसांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत.

या आयडियामुळे जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी काही हल्लेखोरांना अटक करण्यात आले आहे. जामा मशिदीजवळ दगडफेक करणाऱ्या काही हल्लेखोरांमध्ये पोलिसांनी साध्या वेशात काही आपलेच लोक पाठवले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास न होता पोलिसांनी खऱ्याखुऱ्या हल्लेखोरांना पडकले.

शुक्रवारी जामा मशिद परिसरात नमाज पठण झाल्यानंतर जमावात पोलिसांनी काही आपले विश्वासू साथीदार पेरले. काही वेळांनंतर जामा मशिद परिसरात दगडफेकीला सुरूवात झाली. यावेळी समोर असलेल्या पोलिसांकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. कारण, प्लॅन अगोदरच ठरलेला होता.

दगडफेक सुरु होताच गर्दीने रौद्र रूप धारण केले आणि शेकडो लोक जमा झाले. या हिंसक जमावाचे नेतृत्व दोन तरूण करत होते. जमावात साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी त्या दोन तरूणाला हेरले.

यावेळी इतरांना इजा पोहचू नये म्हणून त्यांनी खेळण्यातील बंदुकीचा वापर करत दोन समाजकंटकांना चतुराईने अटक केली. आपला म्होरक्‍याला पोलिसांनी पडकल्याचे समजताच जमाव पांगला आणि दगडफेक करणारे तरुणही पळून गेले.

जम्मू-काश्‍मीर पोलिसांकडून 2010 सालीही अशीच शक्कल लढवण्यात आली होती. ज्यामुळे खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यास मदत झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)