दगडफेक करणारे संभाजी भिडेंचं नाव घेत होते-प्रकाश आंबेडकर

मुंबई : ‘भीमा-कोरेगाव दंगलीत दगडफेक करणारे संभाजी भिडेंचं नाव घेत होते, भिडे यांनीच चिथावणी दिली त्यामुळे हिंसाचार उसळला.’ असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

‘आजपर्यंतच्या तपासात संभाजी भिडे यांचा दंगलीत सहभाग असल्याचा एकही पुरावा समोर आलेला नाही, मात्र अद्याप चौकशी बंद झालेली नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना एकप्रकारे क्लीन चिट दिली आहे. याचविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भिडेंवर आरोप केले आहेत. ‘आम्ही कधीच म्हटले नाही की, भिडेंनी स्वत: दगडफेक केली. पण दगडफेक करणारे संभाजी भिडे यांचे नाव घेत होते. त्यामुळे आमचा असा आरोप आहे की, या हिंसाचारामागे भिडे यांचीच चिथावणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पुरावे दिले होते. ते पुरावे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर करावे.’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)