दगडफेक करणारे “ते’ मराठा आंदोलक नव्हेत…

कारवाई करणार : सहपोलीस आयुक्त बोडखे

पुणे – चांदणी चौकात आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर समाजकंटकांनी झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यावर टाकून तो अडविण्याचा प्रयत्न केला. एवढे करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली असून त्यात 5 ते 6 पोलीस जखमी झाले. या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात तीन ते चार घटना वगळता बंद शांततेत पार पडल्याचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरूवारी सकाळी 6 वाजताच शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा शाळा, महाविद्यालये बंद असल्याने बससाठी प्रवासी नव्हते. शहरात नागरिकांनी स्वत: हून दुकाने, ऑफिसेस बंद ठेवल्याने प्रवासी नसल्याने बस सोडण्यात आल्या नाहीत. मराठा समाजाकडून पोलिसांना अगोदर निवेदन देऊन त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठरल्याप्रमाणे मुख्य संयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाषण करुन आंदोलन संपल्याचे जाहीर केले होते.

यावेळी तेथे साधारण 8 ते 9 हजार जण जमले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांपैकी काहींनी सुरक्षा केबीनच्या काचा आणि लाइट फोडले. जमलेला जमाव कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. चांदणी चौकात आंदोलकांनी ठरल्याप्रमाणे आंदोलन केल्यानंतर ते निघून गेले होते. त्यानंतर जमावाने झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यात टाकून अडथळा आणला तो हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यात पोलीस जखमी झाले. पोलिसांनी तेथे सुरुवातीला लाठीचार्ज केला त्यानंतर अश्रुधराची नळकांड्या फोडून जमावाला पांगवले.

हा प्रकार करणाऱ्यांचा आंदोलकांशी काहीही संबंध नाही, असे सांगून बोडखे म्हणाले, या समाजकंटकांपैकी काही जणांनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांना कोणी नेता नव्हता त्यांच्याकडे झेंडे नव्हते. या समाजकंटकांचे सीसीटीव्ही फुटेज, फोटो मिळाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)