दक्षिण मुंबईतील इमारती युनेस्कोच्या यादीत

मुंबई:  दक्षिण मुंबईतील १९ व्या शतकातील व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींचा  जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यात मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाचाही समावेश आहे. बहरीन येथे सुरू असलेल्या युनेस्कोच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार असून भारतातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.

बहरीनमधील मनामा येथे सुरू असलेल्या ४२ व्या परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी अजंठा, एलिफंटा, वेरूळ व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत आदींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. त्यापाठोपाठ दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या १९ व्या आणि २० व्या शतकातील या इमारतीत उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, एल्फिस्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, ओव्हल मैदान या व्हिक्टोरियन वास्तुशैलीच्या इमारती तसेच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, बॅकबे रेक्लमेन्सनची पहिली रांग, दिनशॉ वाछा रोडवरील राम महल, इरॉस व रिगल सिनेमा हॉल तसेच मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारती आदी वास्तूंचा समावेश आहे.

या वास्तूंचे नामांकन केल्याचे पत्र युनेस्कोच्या तांत्रिक सल्लागार समिती असलेल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर मोमेंटस अँड साईटस् या समितीने राज्य शासनाला पाठविले होते. त्यामध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी मुंबईतील परिसराच्या समावेशास हिरवा कंदिल दाखविला होता. युनेस्कोच्या या निर्णयामुळे देशातील वारसा स्थळांच्या यादीत ३७ व्या स्थळाचा समावेश होणार असून सर्वात जास्त वारसा स्थळे असलेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत ७ व्या क्रमांकावर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)