दक्षिण दिल्ली मतदार यादीत हेराफेरीचा आपचा आरोप 

नवी दिल्ली: दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार यादीमध्ये हेराफेरी झाली असल्याचा आरोप आपने (आम आदमी पक्ष) केला आहे. गेल्या वर्षभरात या मतदार संघातील सुमारे एक लाख मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत आणि त्याला भाजपा जबाबदार आहे असे आपचे म्हणणे आहे.

आपचा हा आरोप भाजपाने फेटाळला असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत टिकून राहण्यासाठी आपचा हा खोटेपणा चालला आहे, असे भाजपाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दक्षिण दिल्ली लोकसभा मतदार संघात 10 विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. आणि गेल्या वर्ष-सहा महिन्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सरासरी दहा हजार नावे काढून टाकण्यात आली आहेत. छत्तरपूर मतदार संघातील 6,500, बिज्वासन मतदार संघातून बारा हजार आणि तुघलकाबाद मतदार संघातून सहा हजार मतदारांची नावे काढून टाकण्यात आली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.2019 च्या लोकसभा निवडणुकीत होणारा पराभव दिसू लागल्याने भाजपा असे करत आहे, असे राघव छड्डा यांनी म्हटले आहे.

आपचा हा सारा खोटेपणा चालला आहे. त्यांच्याकडे खोटेपणाशिवाय करण्यासारखे काहीही नाही. दिल्लीतील जनतेचा आधार गमावत असल्याची खात्री झाल्याने “आप’ला खोटेपणाचा आधार घेण्याची वेळ आली आहे, असे दिल्ली भाजपा जनरल सेक्रेटरी रविंद्र गुप्ता यांनी म्हटले आहे. आपने दिल्लीतील सातही लोकसभा मतदार संघांसाठी प्रभारी नेमले असून लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपावर हल्ले सुरू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)