दक्षिण चीन सागरत भारत-सिंगापूर संयुक्त सागरी महा कवायत सुरू

नवी दिल्ली -भारत आणि सिंगापूर यांच्या नौदलांनी आज दक्षिण चीन सागरात 7 दिवसांची संयुक्त महा सागरी कवायत सुरू केली आहे. सिम्बेक्‍स (सिंगापूर-इंडिया मारीटाईम बायलॅटरल एक्‍झरसाईझ) या भारत आणि सिंगापूर यांच्यातील संयुक्त सागरी कवायतीचे हे 24 वे वर्ष आहे. दोन देशांच्या नौदलांच्या संयुक्त कारवाईत वाढ करणे हा या संयुक्त कवायतीचा हेतू आहे. या वर्षीच्या भारत-सिंगापूर संयुक्त महा सागरी कवायतीत भारताच्या 4 युुद्धनौका आणि लांब पल्ल्याची पाणबुडीविरोधी लढाऊ विमाने पी-81 सहभागी होत आहेत. दक्षिण चीन सागरात चीन वाढते वर्चस्व स्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे,
विविध प्रकारच्या सागरी कारवायांचा या कवायतीत समावेश करण्यात आलेला आहे. एएसडब्ल्यू (अँटि सबमरीन वॉरफेयर), एकात्मिक जमीन, हवा आणि पाण्याखालील युद्ध सराव आणि हवाई संरक्षण आणि जमिनीवरील युद्ध यावर या वर्षीच्या कवायतीचा भर असेल, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी के शर्मा यांनी सांगितले आहे.
सागरी गस्त विमाने फॉक्कर एफ 150 आणि एफ 16 सह सिंगापूरच्या अनेक युद्धनौका या महा सागरी सरावात सहभागी होत आहेत. 1994 पासून सुरू असलेल्या भारत-सिंगापूर संयुक्त सागरी कवायतीचे हे 24 वे वर्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)