दक्षिण कोरियासोबत आम्ही तयार-उत्तर कोरिया

सेऊल :  दक्षिण आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशाच्या देशांच्या प्रस्तावित शिखर परिषदेची रुपरेषा तयार करण्यासाठी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  दक्षिण कोरियासोबत उच्चस्तरीय चर्चेसाठी उत्तर कोरियाने शनिवारी मान्यता दिली आहे. दोन्ही देश या चर्चेसाठी आपले तीन सदस्यीय शिष्टमंडळ गुरुवारी सीमेवरील पनमुंजोम या गावात पाठवणार असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने दिली.

शिष्टमंडळाचे नेतृत्व दक्षिण कोरियाचे एकीकरण मंत्री चो मियोंग-गियोन आणि उत्तर कोरियाचे एकीकरण मंत्री री सोन ग्वोन करणार आहेत. दोन्ही शिष्टमंडळांच्या चर्चेत शिखर परिषदेची तारीख आणि धोरण निश्चित केले जाईल. दक्षिण कोरियाने शिखर परिषदेची रुपरेषा निश्चित करण्यासाठी उत्तर कोरियासमोर बुधवारी उच्चस्तरीय चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. शिखर परिषदेचे आयोजन एप्रिल महिन्यात होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)