दक्षिण – उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना

सेऊल : दक्षिण आणि उत्तर कोरियामध्ये टेलिफोन हॉटलाइनची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील आठवड्यामध्ये या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळेच या टेलिफोन हॉटलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींच्या सेऊल येथील ब्लू हाऊस या निवासस्थानातून उत्तर कोरियामध्ये स्टेट अफेअर्स कमिशनमध्ये एक फोन करून या हॉटलाइनची चाचणी करण्यात आली. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही राष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात पॅन्मुन्जोम येथे भेटणार आहेत. त्याआधी उ. कोरियाचे किम जोंग उन आणि द. कोरियाचे मून जाए-इन फोनवर चर्चा करतील. त्यांच्या भेटीनंतरही ही हॉटलाइन कायम ठेवली जाणार असून दोन्ही देशातील तणावाची स्थिती कमी करण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी तिचा कायम उपयोग करण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)