दक्षिण आशियातील देशांबरोबर भारताचा व्यापार वाढणार

नवी दिल्ली: दक्षिण आशियाई देशाबरोबर दळणवळणाच्या सुविधांमध्ये वेगाने वाढ होत असल्याने भारताचा या देशाबरोबरील व्यापार तिपटीने वाढण्याची शक्‍यता असल्याचे जागतिक बॅंकेने अहवालात म्हटले आहे. सध्या या क्षेत्रातील देशांबरोबरचा भारताचा व्यापार 19 अब्ज डॉलर्स आहे. तो 62 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याच्या संधी आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापाऱाच्या दृष्टीने हा केवळ 3 टक्के आहे, असे जागतिक बॅंकेकडून सांगण्यात आले.

अनेक क्षेत्रातून भारतात माल आल्यास ग्राहकांना तो स्वस्त दराने उपलब्ध होईल. भारत आणि पाकिस्तानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सचा असून दोन्ही देशांतील तणाव दूर केल्यास तो 37 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. भारत-श्रीलंका हवाई सेवा आणि भारत-बांगलादेश सीमा हाटमुळे व्यापारात वाढ होत आहे. प्रादेशिक संबंध वाढविल्यास या भागातील व्यापारात वाढ होईल असे म्हणण्यात आले. 2016 मध्ये दक्षिण आशियातील सरासरी मालवाहतूक वर्दळ 13.6 टक्‍के होती, तर जागतिक पातळीवर ती 6.3 टक्के होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)