दक्षिण आशियाई कुंग-फू कराटे स्पर्धेत मावळला पाच सुवर्ण

तळेगाव दाभाडे – काठमांडू (नेपाळ) येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई कुंग-फू कराटे स्पर्धेत मावळ तालुक्‍यातील कराटे खेळाडूंनी पाच सुवर्ण, एक रौप्य, तर दोन कांस्य पदक मिळविले. या स्पर्धेत नऊ देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

मावळ तालुक्‍यातील संदीप कुंजीर, नितेश चव्हाण, आभिषेक बगलाने, प्रेम सराफ, योगीता लामा या 5 खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळविले. निर्मिती तावडे या खेळाडूने रौप्य पदक मिळविले. यश भोंगले व नैना लामा या खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले. मावळ तालुक्‍याचे नाव दक्षिण आशियाई विभागात चमकावले. तसेच भारतीय संघाला अव्वलस्थान प्राप्त केले.
या खेळाडूंना संघ व्यवस्थापक सुनील तावडे, संघ प्रशिक्षक सुनील खंडाळे व विक्रांत अग्रवाल आदींनी खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम केले. सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन ऑल इंडिया कुंग-फू फेडरेशनचे अध्यक्ष सीफू सी. एल. लामा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)