दक्षिण आफ्रिकेतील कैद्यांंनी घेतला विधायक प्रकल्प हाती

जोन्हासबर्ग– दक्षिण आफ्रिकेतील कैद्यांंनी एक चांगला प्रकल्प हाती घेतला आहे. देशाचे अहिंसावादी महान नेते नेल्सन मंडेला यांची प्रतिमा असलेली जगातील सर्वात मोठी चादर विणण्याचे काम कैद्यांनी हाती घेतले आहे. त्यांची ही चादर अंतराळातूनही दिसेल एवढी मोठी असणर आहे.
मंडेला यांनी राष्ट्रसेवेमध्ये आपले आयुष्य खर्ची घातले होते. त्यांची पुढील वर्षी १८ जुलै रोजी १०० वी जयंती साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने महाचादर निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ६७ ब्लँकेट््स फॉर मंडेला या संघटनेच्या वतीने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. देशभरातील तुरुंगात असलेल्या कैद्यांनी चादरीच्या कामाला सुरुवात केली आहे. पुढील वर्षी चादर विणण्याचे काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले. मंडेला यांचे ९५ व्या वर्षी डिसेंबर २०१३ मध्ये निधन झाले होते. २०१४ मध्ये ६७ ब्लँकेट्स फॉर मंडेला संघटनेने सर्वाधिक चादरी तयार करण्याचा जागतिक विक्रम केला होता.  नेल्सन मंडेला मदिबा म्हणून देशात परिचित आहेत. त्यांची ही चादर विशालकाय असेल. त्यावरील मदिबांचा चेहरा तुम्हाला आकाशातूनच नव्हे, तर अंतराळातूनदेखील पाहणे शक्य होणार आहे, असा दावा संघटनेचे कॅरोलिन स्टिन यांनी केला आहे.
ही महाकाय चादर चौरस मीटर क्षेत्रफळात तयार होणार आहे. त्यासाठी विविध आकाराच्या चादरी वेगवेगळ्या तुरुंगात तयार करण्याचे काम सुरू आहे. ते सर्व तुकडे एकत्र करून जुळवण्याचे काम केले जाणार आहे. प्रत्येक तुकडा १६० बाय १६० सेंटिमीटरचा असेल, अशी माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)