दक्षिण आफ्रिका 6 बाद 313; आयडेन मारक्रॅमचे दीडशतक

ख्राईस्टचर्च  – आयडेन मारक्रॅमची दीडशतकी खेळी आणि डीन एल्गर, ऍब डीव्हिलिअर्स व हाशिम आमलाच्या साथीत त्याने रचलेल्या दमदार भागीदाऱ्यांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावांत 6 बाद 313 धावांची मजल मारली.

पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा टेम्बा बाव्हुमा नाबाद 25 धावांवर खेळत असून क्‍विन्टन डी कॉक नाबाद 7 धावांवर त्याला साथ देत आहे. दक्षिण अफ्रिकेचा सलामीवीर आयडेन मारक्रॅमने 216 चेंडूंत 152 धावांची खेळी करताना दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. त्याच्या खेळीत 11 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर मारक्रॅमने पहिल्या गड्यासाठी एल्गरसह 52 धावांची भागीदारी करत आफ्रिकेला सुरेख सुरुवात करून दिली. एल्गरने 19 धावा केल्या. मारक्रॅमने हाशिम आमलाच्या (27) साथीत 89 धावांची भागीदारी करीत आफ्रिकेची आगेकूच कायम राखली.

आमला बाद झाल्यानंतर मारक्रॅमने डीव्हिलिअर्सच्या साथीत 105 धावांची भागीदारी करीत आफ्रिकेला सुस्थितीत नेले. अखेर कमिन्सने मारर्क्रॅमला बाद करून ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. डीव्हिलिअर्सने 117 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 69 धावांची खेळी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस खातेही न उघडता माघारी फिरला. तर दिवसाचा खेळ संपण्यास 4 षटके बाकी असताना मिचेल स्टार्कच्या जागी संधी मिळालेल्या चॅड सेयर्सने डीव्हिलिअर्सचा अडथळा दूर केला. तसेच रबाडालादेखील भोपळा ही न फोडू देता परतवून चॅडने कसोटी कारकिर्दीतील आपला दुसरा बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक – दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 88 षटकांत 6 बाद 313 (आयडेन मारक्रॅम 152, डीव्हिलिअर्स 69, हाशिम आमला 27, पॅट कमिन्स 53-3, चॅड सेयर्स 64-2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)