दंतचिकित्सा (भाग १)

लहानपणापासूनच काळजी घेतल्यास दात निरोगी व सुंदर राहतील. दोन मुलांमध्ये दंतक्षयाचे प्रमाण सुमारे 70 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. दात किडण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारात जे पिष्टमय पदार्थ येतात ते दातांच्या फटींमध्ये अडकून बसतात. त्यावर आपल्या तोंडातील जंतूंची प्रक्रिया होऊन आम्ले तयार होतात. या आम्लांचा दातांच्या पृष्ठभागावर परिणाम होतो व त्यामुळे त्या भागातील कॅल्शियम विरघळते आणि त्या भागात एक खड्डा पडतो. त्या खड्ड्यात परत अन्नकण अडकून बसतात व दात किडायची क्रिया ही कायम सुरू राहते.
त्यामुळे दात सतत किडत राहतो. दात पूर्णपणे किडल्यानंतर त्यांचे तुकडे पडायला लागतात व ही कीड दातांच्या आत शिरा व नसा असलेल्या मऊ भागापर्यंत (पल्प चेंबर) पोहोचते व त्यामुळे दातदुखी सुरू होऊन शेवटी गळू तयार होते व दात काढण्याची जरूर पडते. दातांची कीड थांबविण्यासाठी खालील दर्शवल्याप्रमाणे काळजी घेतल्यास दंतरोगापासून बचाव करता येईल.
लहान मुलांना बाटलीने दूध पाजण्याच्या वेळी बाटली फार काळ तोंडात ठेवू नये. त्यामुळे दूध तोंडात साठून राहते व दात किडण्यास मदत करते. आहारात फार शिजलेले, मऊ, गोड, चिकट पदार्थ विशेष करून नसावे. गोळ्या, चॉकलेट हे पदार्थ म्हणजे दातांचा सर्वांत मोठा शत्रू. हल्ली मुलांना हे पदार्थ खाण्याची वाईट सवय लागली आहे. याऐवजी शेंगदाणे, सुकामेवा, काकडी, गाजर, सफरचंद, पेरू असले कच्चे व ज्यांना जास्त चर्वण करावे लागेल, असे पदार्थ दिल्यामुळे दात आपोआप स्वच्छ तर होतीलच पण दातांना योग्य व्यायाम मिळून ते निरोगी राहतील. अन्नकण अडकून बसल्यामुळे दात किडणार नाहीत. दात स्वच्छ ठेवण्याचे दोन मार्ग म्हणजे गुळण्या करणे व दात ब्रशने स्वच्छ करणे. दात स्वच्छ करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्रश.
आपण खाल्लेले पदार्थ चावून बारीक करतो. त्यामुळे ते दातांच्या फटीमध्ये अडकून बसतात. त्यामुळे दात किडतात व तोंडाला वाईट वास येतो. हे अन्नकण आपल्याला दात नुसत्या बोटाने घासून काढून टाकता येत नाहीत. पण ब्रशला असलेले बारीक केस दाताच्या फटीत अडकलेले अन्नकण काढून टाकतात व दात स्वच्छ राहतात प्रत्येक जेवणानंतर व झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर दात ब्रश करणे जरूर आहे. ब्रशबरोबर टुथपेस्ट वापरलीच पाहिजे असे नाही. पण पेस्टमध्ये असलेल्या घटकांमुळे दातांवर तयार होणारा चिकट पदार्थ (प्लाक) निघण्यास (दाढदुखी विकार जवळजवळ प्रत्येक घरात आढळतो. दातांची योग्य काळजी घेतली तर दाढदुखी उद्‌भवत नाही.) मदत होते व पेस्टमध्ये असलेल्या सुवासामुळे तोंडाचा वास जाऊन प्रसन्न वाटते. लहान मुलांना फ्लोराईडयक्‍त पेस्ट वापरणे फायदेशीर होते. या क्षारामुळे दातांच्या बाहेरील कवच (इनॅमल) कठीण होते व त्यावर आम्लांचा परिणाम न झाल्यामुळे दात किडण्याला आळा बसतो. दरवेळी खाल्ल्यानंतर खळखळून गुळण्या केल्यामुळे अडकून बसलेले अन्नकण निघतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)