दंड नको, आम्ही हेल्मेट वापरतो

दुचाकीस्वारांचा सूर, प्रमाण वाढले

पुणे – शहरात सुरू असलेल्या हेल्मेट कारवाईची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र चौका-चौकांत दिसून येत आहे. परिणामी, हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एकूणच दंड टाळण्यासाठी दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत असल्याचे चित्र शहरात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात दि.1 जानेवारीपासून हेल्मेट कारवाई वाढवण्यात आली आहे. यासाठी वाहतूक पोलिसांच्या 22 वाहतूक विभागांनी ही मोहीम हाती घेतली असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. अशा प्रकारे साधारणतः दररोज सात ते साडेसात हजार नागरिकांना “नो हेल्मेट’चा दंड लावण्यात येत आहे. यात सीसीटीव्ही आणि मॅन्युअली कारवाईचा समावेश आहे. “नो हेल्मेट’ला लावण्यात येणारा दंड मोठा आहे. अशातच वाहतूक पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवल्याने धास्तावलेल्यांनी स्वतःहून पुढाकार घेत हेल्मेट खरेदी केले आहेत. यामुळे अगोदर विनाहेल्मेट दिसणारे वाहनचालक आता हेल्मेट परिधान करुन जात असल्याचे चित्र शहरातील बहुतांश भागात आहे. दरम्यान, हेल्मेट कारवाईविरोधात हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीसह काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोधात आंदोलने केली. मात्र, कायद्यानुसार हेल्मेट परिधान करणे अनिवार्य असल्याचे सांगत पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली. आंदोलनामुळे हेल्मेट कारवाईत काही फरक न पडल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यावर अनेक नागरिकांनी हेल्मेट खरेदी केले असून वापर सुरू केला आहे. यामुळे काही प्रमाणात पोलिसांना यश आल्याचे दिसून येत आहे.

“डबलसीट’ व्यक्तीलाही दंड
नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीसह दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट असणे गरजेचे आहे. यामुळे अशाप्रकारे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीलाही दंड लावण्यात येत आहे. दरम्यान, हेल्मेट कारवाईला होणारा विरोध पाहता सध्यातरी मॅन्युअली कारवाई करताना “डबलसीट’ बसलेल्यांना लक्ष्य केले जात नाही. मात्र, सीसीटीव्हीद्वारे “नो हेल्मेट’ कारवाई करताना “डबलसीट’ व्यक्तीलाही “नो हेल्मेट’चा दंड लावण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)