दंगलखोरांनी नगरमध्ये पेटविल्या दुचाकी ; कोठला आणि वंजारगल्लीतील युवकांमध्ये राडा

 45 जणांविरोधात गुन्हा, सहा जण ताब्यात

नगर: शहरातील मध्यवर्ती असलेल्या वंजारगल्ली भागात वाहनांचा एकमेकांना धक्का लागल्याने दंगा झाला आहे. कोठला आणि वंजारगल्लीतील दोन गट तलवार, गुप्ती, लाकडी दांडके, गज घेऊन समोरासमोर येत दगडफेक करत दोन दुचाकी वाहने पेटवून दिली. दगडफेकीमुळे या परिसरात सायंकाळीपर्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरुद्ध फिर्यादीवरून सुमारे 44 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 19 ते 30 वयोगटातील सहा युवकांना ताब्यात घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तन्वीर बशीर पठाण (वय 33, कोठला), फरदीन तनवीर सय्यद (वय 18, कोठला), साबीर सादीक सय्यद (वय 19, कोठला), वैभव संजय होंडे (वय 30, वंजारगल्ली), रोहत वसंत फंड (वय 28,वंजारगल्ली), अझरुद्दीन नुरमहंमद शेख (वय 22, कोठला) या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सहा जण वंजारगल्लीतील मारामारीत जखमी झाले होते. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. पोलिसांनी लगेचच त्यांना ताबत घेतले. आडतेबाजार-दाळमंडई परिसरात लहान मुलाला दुचाकी धक्का लागल्यावरून वादाला सुरूवात झाली.

या मुलाला मारहाण झाल्यानंतर काही वेळातच कोठला व वंजारगल्ली येथील दोन गट समोरासमोर आले. यावेळी दोन्ही गटातील युवकांच्या हातात तलवारी, लाकडी दांडके, गुप्ती, गज आणि दगडे होते. दोन्ही गट समोरासमोर येताच वादाला तोंड फुटले. सोडा वॉटरच्या बाटल्या काहींनी फेकल्या. तलवारीने वार झाले. या राड्यात सहा जण जखमी झाले आहेत. हा राडा एवढा विकोपाला गेली की, दोन दुचाकीही पेटवून देण्यात आल्या. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नियंत्रण विभागाला काही स्थानिक लोकांनी राड्याची माहिती दिली.

भिंगार कॅम्प, नगर तालुका तोफखाना, कोतवाली पोलिसांसह वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शीघ्रकृती दलाने देखील परिस्थितीवर ताबा मिळविण्यासाठी परिसरात गस्त वाढली. अतिरीक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, नितीनकुमार गोकावे हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दंगल नियंत्रण पथक देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्त वाढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.


मोटरगाडी पेटविण्याचा प्रयत्न फसला

वंजारगल्ली येथे दुचाकी पेटविण्यात आल्या तेथून काही अंतरावर मोटरगाडी उभी होती. ही मोटरगाडी पेटवून देण्याचाही प्रयत्न झाला. काहींनी सीसीटीव्ही कॅमेरा आहे, असा आरडाओरडा केल्यानंतर जमावाने तेथून पळ काढला. जाळपोळ व दोन गटांत दंग्याचे माहिती आडतेबाजार, दाळमंडई परिसरातील वाऱ्यासारखी पसरली. त्याचक्षणी काहींनी दुकाने बंद केली.


वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मॉक ड्रिलचा समज

वंजारगल्लीतील दंग्यावर नियंत्रणासाठी शहरातील आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना संदेश देत घटनास्थळी पाचारण करण्याची सूचना होती. यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटले की, हे मॉक ड्रिल आहे. परंतु घटनास्थळी पोहचल्यावर परिस्थिती लक्षात आली. दंगा सुरू असल्याचे लक्षात आल्यावर हे वरिष्ठ अधिकारी अधिक दक्ष झाले. वंजारगल्ली आणि परिसरात रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त वाढविला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)