“थ्री स्टार’ रेटींगसाठी पालिकेने कसली कंबर

80 टक्‍के वर्गीकरणासह 80 टक्‍के प्रक्रिया करण्याचा दावा


स्वच्छ भारत अभियान स्पर्धा

पुणे – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांसाठी 1 ते 7 स्टार मानांकन करण्यात येणार आहे. त्यांतर्गत महापालिकेने 3 स्टार मानांकनासाठी कंबर कसली असून त्यासाठी वर्गीकरण आणि कचरा प्रक्रियेचे 80 टक्‍के काम करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे मानांकन जाहीर करून राज्य शासनास पाठविले जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाकडून शहर सुधारणा समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या 2018 व 2019 च्या स्पर्धेत काही बदल करण्यात आले असून यापुढे शहरांचे रॅकींग ठरवितानाच शहराचे स्टार रेटींग केले जाणार आहे. त्यासाठी 1 ते 7 स्टार रेटींग निश्‍चित केले असून 5 आणि 7 स्टार रेटींगसाठीच्या अटी कडक असून स्वच्छतेबाबत शहर 100 टक्‍के परिपूर्ण असणे आवश्‍यक आहे. शहरातील सध्याची घनकचरा व्यवस्थापन नियोजन, कचरा वर्गीकरण, तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्पांची सद्यस्थिती आणि पुढील काही वर्षांचे नियोजन पाहाता महापालिकेस या स्पर्धेत 5 आणि 7 स्टारसाठी मानांकन घोषित करणे शक्‍य नाही. त्यामुळे प्रशासनाने शहरासाठी 3 स्टार मुल्यांकन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मुल्यांकन जाहीर झाल्यानंतर शासनाकडून पालिकेने राबविलेल्या उपाययोजनांची माहिती तसेच तपासणी करून शहरासाठी स्वच्छतेचे मुल्यांकन जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून ही तपासणी केली जाणार आहे.

काय आहे पालिकेचे उद्दीष्ट
पालिका प्रशासनाकडून शहर सुधारणा समिती समोर ठेवण्यात आलेल्या प्रस्तावात, घरोघरी कचरा संकलन करणे 100 टक्‍के, कचरा वर्गीकरण 80 टक्‍के करणे, लीटर बीन्स वापर 80 टक्‍के, कचरा प्रक्रिया करणे 75 टक्‍के, स्वच्छता अॅप डाऊनलोड 10 टक्‍के, ऑनलाइन तक्रार निराकारण 100 टक्‍के, शहर स्वच्छता 100 टक्‍के, कचरा संकलन 100 टक्‍के, नदी, नाले, तलाव, पाणी साचून राहणारी ठिकाणे स्वच्छ ठेवणे 100 टक्‍के, वापरकर्ता शुल्क नियम करणे, व्यापारी क्षेत्र संस्था यांच्याकडून शुल्क वसूल करणे आणि प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करणे या उद्दीष्टांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)