थोरात कारखान्याकडून ठिबक सिंचनचे प्रतिटन 100 रुपये अनुदान बॅंकेत जमा

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या ठिबक सिंचन बसविणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन 100 रुपये अनुदान बॅंकेत जमा केल्याची माहिती थोरात कारखान्याचे अध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे यांनी दिली.
या कारखान्याने नव्याने 5 हजार 500 मे.टन क्षमतेचा नवीन साखर कारखाना व 30 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प कमी वेळेत, कमी खर्चात कार्यान्वित केला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने ठिबक सिंचन प्रणालीचा पुरस्कार केला आहे. म्हणून कार्यक्षेत्रात ठिबक सिंचनवर जास्तीत जास्त लागवड होण्यासाठी संचालक मंडळाने मागील तीन वर्षांपासून हे अनुदान सुरु केले आहे. यावर्षी गाळपाला येणाऱ्या व पुढील वर्षाकरिता ही अनुदान योजना राबविण्याचे धोरण घेतलेले आहे. पाणी बचत हीच पाणी निर्मिती असून कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळावे, यासाठी प्रोत्साहनपर ही योजना राबविली जात असून ती राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. ऊस उत्पादकांच्या खात्यावर प्रतिटन 100 रुपये प्रमाणे रक्‍कम जमा करण्यात आली आहे. या ठिबक सिंचन प्रणालीचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी कारखान्याचे गट ऑफिस व शेतकी ऑफीसला संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)