थोरातवाडी शाळेला वॉटर फिल्टर

कुरवली-थोरातवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासत संदिप कुंभार यांनी स्वखर्चाने वॉटर फिल्टर भेट दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा गैरसोय होत असते. याची जाण ठेवून शाळेसाठी आरओ फिल्टर दिला. तसेच 500 लिटर पाणी क्षमतेची टाकी व वॉटर प्लंबर साहित्य ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय गायकवाड यांनी दिले. यावेळी संदिप कुंभार म्हणाले, सधन कुटुंबात फिल्टरचे पाणी वापरले जाते; परंतु गरीब कुटुंबात रेग्युलर पाणी असते. त्यामुळे सर्वच मुलांना फिल्टरचे पाणी मिळावे यासाठी शाळेला ही मदत करीत आहे. केंद्र प्रमुख रविंद्र तावरे थोरातवाडीची शाळा ही डिजीटल शाळा होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक सुभाष वनवे, सरपंच रानी थोरात, उपसरपंच शैलजा पवार, केशव नगरे, नितिन पवार, सचिन भिसे, राजेंद्र जगदाळे, शालिनी साळुंके, नूतन नगरे, सीमा तनपुरे, इक्‍बाल बागवान, बाळासाहेब नगरे, सुभाष थोरात, ग्रामसेवक अजित भोसले, रुपाली थोरात इ मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)