थोरातवाडीतील ग्रामस्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

भवानीनगर- इंदापूर तालुक्‍यातील थोरातवाडी (वकीलवस्ती) ते मोहितेवाडी रस्त्याचे डांबरीकरण करावे; अन्यथा लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिषकार टाकण्यात येईल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. थोरातवाडी ते मोहितेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाची येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत. परंतु या रस्त्याचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडलेले आहे. श्री छत्रपती कारखान्याला या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक होते. त्यामुळे रस्ता खचला असल्यामुळे ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. गेली 15 वर्षांपासून या भागातील ग्रामस्थ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करीत आहेत, तरीही कायम या ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)