थोरांदळेत दोन बकरांचा बिबट्याकडून फडशा

मंचर-थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील शेवगा मळ्यात बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यात शिरून दोन बकरांचा फडशा पाडला. ही घटना सोमवारी (दि. 12) रात्री दहा वाजता घडली.
थोरांदळे गावानजिक शेवगामळा आहे. तेथे ज्ञानेश्‍वर सावित्रा टेमगिरे यांचा वाडा गेल्या तीन दिवसांपासून होता. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्‍वर टेमगिरे, आनंदा करगळ हे वाड्याशेजारी गप्पा मारत बसले होते. यावेळी बिबट्याने थेट वाघुर लावलेल्या वाड्यात उडी मारली. वाड्यातील दोन बकरांना ठार मारले. त्यावेळी इतर शेळ्या मेंढ्यांनी आरडाओरडा केला. मेंढपाळ आणि ज्ञानेश्‍वर टेमगिरे यांनी आरडाओरडा केला. बिबट्याने पुन्हा वाघुराच्या जाळीवरून बाहेर उडी मारली व ओढ्याच्या बाजुने पळून गेला. बाळासाहेब भिकाजी टेमगिरे यांनी वन विभागाला खबर दिली. मंगळवारी सकाळी वनक्षेत्रपाल प्रज्योत पालवे, वनपाल मंगेश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपत भोर, शरद जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन दिवसांपूर्वी याच भागात दौलत शंकर भोर यांनी बिबट्याला रस्त्यात पाहिले होते. या घटनेमुळे थोरांदळे परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी माजी सरपंच सिताराम गुंड, बाळासाहेब टेमगिरे, सुरेश टेमगिरे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)