थोरांदळेत कृषिदुतांचे स्वागत

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील थोरांदळे येथे आलेल्या कृषीदुतांचे स्वागत ग्रामस्थांच्या वतीने सरपंच पुष्पा टेमगिरे आणि उपसरपंच विकास मिंडे यांनी केले. पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, संलग्न येथील कृषिदूत रोहीत पाटील, महेश साळंके, अमित थोरात, अमर जाधव, प्रशांत साळवे, हेमंत होवाळ, दिगंबर इंगळे यांचे स्वागत केले. यावेळी माजी सरपंच सीताराम गुंड, माजी उपसरपंच मंगेश टेमगिरे, दिनेश मिंडे आणि ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. कृषिदूत पदवीच्या शेवटच्या वर्षाला राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यानुभवाअंतर्गत विविध प्रात्यक्षिक घेऊन शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख ग्रामस्थांना करुन देणार असल्याचे मार्गदर्शक सुधाकर निंबाळकर, सुधीर शिंदे, भरत जाधव, किरण गोसावी यांनी सांगितले. सूत्रसंचालन संतोष गवारे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)