थोरांतामुळेच विकास प्रक्रियेत अडथळे

File Photo

नामोल्लेख टाळून राधाकृष्ण विखे यांची टीका; उज्वला गॅसजोडचे वितरण
राहाता – शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या 26 गावांच्या विकासात आपण कुठेही कमी पडलेलो नाही. विकासाच्या प्रक्रियेतून आपण येथील सर्वसामान्य माणसांमध्ये विश्‍वास निर्माण केला; पण सर्वसामान्य माणसांच्या अडलेल्या कामांत संगमनेरमधल्या माणसांनीच अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ज्यांना हा विकास पाहावत नाही, ते आज फक्‍त व्यक्तिगत टीका करतात, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
कोल्हेवाडी येथे दोन हजार शंभर लाभार्थींना मोफत उज्वला गॅस कनेक्‍शनचे वितरण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अटल विश्‍वकर्मा योजनेत सहभाग घेतलेल्या कामगारांनाही योजनेचे पत्र देण्यात आले. जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भास्करराव दिघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील, उपाध्यक्ष कैलास तांबे, ऍड. बापुसाहेब गुळवे, बाळासाहेब भवर, दिलीप शिंदे, जिल्हा परिषद सदस्य ऍड. रोहिणीताई निघुते, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, दीपाली डेंगळे, भगवानराव इलग, किशोर नावंदर, सरपंच संदीप देशमुख, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार रावसाहेब सोनवणे, मोहनराव वामन, रखमाजी खेमनर, बुवाजी खेमनर आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, की शिर्डी मतदारसंघात या गावांचा समावेश झाल्यानंतर रस्त्यांच्या कामांना आपण प्राधान्य दिले. गेली अनेक वर्षे ज्या गावात एसटी येत नव्हती, तिथून आज 8 एसटी जात आहेत. या सर्व गावांमध्ये विकासाची प्रक्रिया राबविताना आपण कुठेही कमी पडलेलो नाही. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करतानाच जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून मोफत अपघात विमा योजना सुरू केली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मतदारसंघातील या गावांमध्ये विधायक उपक्रम म्हणून आरोग्य शिबिरे भरवू. मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांचे काम येत्या काही दिवसांत सुरू करू. पंतप्रधान पेयजल योजनेतून 225 कोटी रुपयांच्या मंजूर झालेल्या आराखड्यातून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देऊ.
डॉ. सुजय विखे पाटील या वेळी म्हणाले, “” शासनाच्या योजनेव्यतिरिक्‍तही जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून लोकहिताची कामे प्राधान्याने केली जात आहेत. येथे कोण राजकारण करते याच्याशी मला घेणेदेणे नाही. त्यांच्या माध्यमातून योजनांचे साहित्य येत असेल तर जरुर स्वीकारा. आगामी काळात तीन महत्वपूर्ण योजनांची कामे या गावांमध्ये आपण करणार आहोत. अन्नसुरक्षा यादीमध्ये समाविष्ठ असलेल्या खोट्या लाभार्थींची नावे काढणार असून यासाठी संगमनेर तहसील कार्यालयाचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. प्रत्येक घरात रेशनकार्ड देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. घरकुलांच्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी ज्या लाभार्थ्यांना जागा मिळणार नाही, त्यांना जागा विकत घेऊन घरकुल बांधून देणार आहोत.
याप्रसंगी दिघे, ऍड. निघुते, शिंदे यांची भाषणे झाली. संजय कोल्हे यांनी प्राप्ताविक केले तर नानासाहेब दिघे यांनी आभार मानले.

व्हाया संगमनेर काहीच नको-विखे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील अनेक वर्षे या गावांमधून एकही एसटी जात नव्हती. रस्त्यांची कामे मार्गी लावून गावे जोडल्यामुळे आज एसटी गावापर्यंत पोचली आहे. त्यामुळे गावांमधील नागरिकांचा प्रवास सरळ होऊ लागला आहे. येथून पुढे व्हाया संगमनेर काहीच नको. व्हाया संगमनेर घेऊन जाणारे मधलेच घोटाळा करतात, अशी टीका राधाकृष्ण विखे यांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)