थोरले पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह

आळंदी- येथील श्री ज्ञानेश्वर महाराज थोरले पादुका मंदिरात गुरुवार दि. 31जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचे आयोजन करण्यात आल्याचे ट्रष्टचे अध्यक्ष ऍड. विष्णुपंत तापकीर यांनी सांगितले. या सप्ताहात 5 फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता होमहवन, नऊ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज समाधी पूजा आणि ज्ञानज्योत प्रज्वलन शांतीब्रह्म मारुती महाराज कुर्हेकर यांच्या हस्ते होणार आहे. साडेनऊ वाजता मूर्तीची भव्य मिरवणूक श्रीक्षेत्र अलंकापुरी नगरीतील प्रदक्षिणा मार्ग ते श्री ज्ञानेश्वर महाराज थोरले पादुका मंदिर अशी पाच किलोमीटर हरिनाम गजरात आणि हजारोंच्या उपस्थितीत निघेल. 6फेबुवारीला विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, 7 फेब्रुवारीला मूर्तीची प्रतिष्ठापना व महाआरती, तसेच दररोज रात्री 7 ते 9 नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा होईल. 31जानेवारी एकादशी गुरुवार ते 9 फेब्रुवारी शनिवारी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल, असेही खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)