थोपटे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण

भोर- येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या 80 विद्यार्थिनींना तीन दिवसीय सैनिकी शिबिरात शस्त्रविद्या, शस्त्र कवायत, नकाशा वाचन, संचलन, भूमी कौशल्य, प्रथमोपचार, शारीरिक स्वास्थ्य, फिल्ड सिग्नल, नागरी सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, लष्करी इतिहास आदिंचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराचे उद्‌घाटन अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी केले. शिबिरात सुभेदार कुलबीर सिंग, हवालदार तानाजी डांगे, व्ही. पी. तिवारी, संतोष कुमार यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. या केडर कॅम्पचे आयोजन ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर देवेंद्र दहिया, गर्लस बटालियनच्या कमांडींग ऑफिसर कनकलता चौरे, कर्नल ओ. पी. पांडे यांनी केले होते. प्रशिक्षण शिबिर मुलींना सैन्य दल आणि प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी उपयुक्त ठरणार असून त्यांना यासाठी आवश्‍यक असणारे बी आणि सी प्रमाणपत्र मिळविणे सोपे होणार असल्याचे अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागप्रमुख प्रा. मेजर सावित्रा साळुंखे यांनी सांगितले. अंडर ऑफिसर छात्र अंकिता जाधव हीने आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
2 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
2 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)