थोडेसे नवीन वर्षाच्या स्वागताविषयी…

डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध लागला की वेध लागतात ते नवीन वर्षाचे अन्‌ त्याच्या स्वागताचे. आपण लागलीच सरत्या वर्षाच्या आठवणी मनात साठवत नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करु लागतो. थोडक्‍यात ते बरोबरच आहे. कारण कुठल्याही नवीन येणाऱ्या गोष्टीचे आपण आवर्जुन स्वागत करतो. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना काही गोष्टींचे संकल्प जरुर करायचे असतात. मावळत्या वर्षातल्या काही वाईट सवयी, व्यसने इ.नवीन वर्षात सोडण्याचा आपण संकल्प करु शकतो. तसेच मावळत्या वर्षात झालेल्या चुका, नियमित कामातील कंटाळा वा चालढकलपणा इ.गोष्टीत येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सुधारणा करण्याचा संकल्प करु शकतो. त्याचबरोबर नवीन वर्षात काही नवीन करण्याचा, शिकण्याचा संकल्प करु शकतो. सरत्या वर्षाला निरोप देतांना आपण घरी गोडधोड, चटकदार पदार्थ बनवून त्याचा परिवारासोबत आस्वाद घेऊ शकतो.

काही लोक मात्र यासाठी वेगळ्याच मार्गाचा अवलंब करतात. मद्यपान, पार्ट्या, डिजेचा गोंगाट अशा गोष्टींचा अवलंब काही लोक नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी करताना दिसतात. आपणा सर्वानाच माहीत आहे की, अशाप्रकारे आपल्या आनंदाचा उन्माद करणे आपल्यासाठी आणि समाजासाठी घातक आहेत. तरीदेखील अशा प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्‍न आपणच स्वतःला विचारायला हवा. माझे स्वतःचे प्रामाणिक मत असे आहे की, अशा प्रसंगी मद्यपान, पार्ट्या, डिजे इ.गोष्टींचा गाजावाजा न करता साधेपणाने चांगले संकल्प करुन नवीन वर्षाचे स्वागत करावे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नववर्षाच्या स्वागतासंदर्भात अक्षय कुमार या नावाजलेल्या बॉलिवूड अभिनेत्याची एक खास आठवण यानिमित्ताने सांगावीशी वाटते. एका अॅवॉर्ड शो मध्ये बोलताना अक्षय कुमार म्हणाला होता की, “1 जानेवारीच्या पहाटे जेव्हा मी जॉगिंग करत रस्त्यावर धावत असतो त्यावेळी इतर सेलिब्रिटीज 31 ची पार्टी उरकून घराकडे निघालेले असतात.” नवीन वर्षाच्या सर्वांना आगाऊ शुभेच्छा…

“आयुष्यातील काही वर्ष गोड आठवणी देत नाहीत, परंतु असे धडे देतात ज्यामुळे आयुष्याला योग्य वळण मिळते” हे कोण्या अननोन व्यक्तीचं सुभाषित माझ्या आयुष्यातील 2018 या वर्षाला तंतोतंत लागू होतं. येणाऱ्या वर्षामध्ये भूतकाळात मिळालेल्या ‘लेसन्स’द्वारे पुढची वाटचाल कशाप्रकारे योग्य दिशेने होईल याकडे फोकस असेल. या नवीन वर्षामध्ये नवीन स्किल्स शिकण्याकडे कल असेल, तसेच कमी झालेले वाचन वाढविण्याचा देखील संकल्प केला आहे.

– अक्षय साळी

नवीन वर्षात अधिक आत्मविश्‍वास आणि माझी क्षमता वाढवणाचा प्रयत्न करेल. तसेच दररोज काहीतरी नवीन शिकेल. आपण दरवर्षी नवीन वर्षात काहीतरी संकल्प करतो पण नंतर विसरून जातो. येणाऱ्या नवीन वर्षात केलेला संकल्प पूर्ण करेल. कोणताही संकल्प पूर्ण करायचा असेल तर वेळेच्या नियोजनाला अनन्यसाधारण महत्व आहे. नियोजन करून कामे केल्यास ती पूर्णत्वाकडे जातात म्हणूनच नियोजन आखून कामे उरकेल त्यामुळे आपल्याला शिस्त लागेल.

– पूनम कापडे

मला नवीन वर्षात बुलेट चालवायला शिकायचं आहे. तसेच मला मिळालेल्या सर्व संधींचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी 100 टक्के प्रयत्न करेल. या नवीन वर्षात चैनीच्या वस्तू विकत घेणे टाळेल. कारण पैशांची उधळपट्टी होते. फक्त आवश्‍यक वस्तूच विकत घेईल. आयुष्यामध्ये पुढे जायचे असेल तर आपले आरोग्य सांभाळणे देखील तितकेच महत्वाचे आहे. या नवीन वर्षामध्ये व्यायामाला सुरुवात करून निरोगी राहण्याचा प्रयत्न करेल.

– मेघना पवार

नवीन वर्षांमध्ये मी माझ्या कुटुंबियांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा संकल्प केला आहे. बऱ्याच वेळा आपण फ्रेंड्‌स, कॉलेज, जॉब या गोष्टींमुळे फॅमिलीसाठी जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. यातूनच मग पुढे कुटुंबामध्ये अनेक कलह निर्माण होतात. यामुळेच मी नवीन वर्षामध्ये टाइम मॅनेजमेंट करून फॅमिलीसाठी जास्तीत जास्त वेळ देणार आहे. इंटरनेटच्या आभासी युगामध्ये जग जवळ येत असले तरी कुटुंबीयच आपल्यापासून दुरावत आहेत.

– विकास गायकी

– अतुल शिरडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)