Video: थोडेच दिवस उरले आहेत, सत्तेची मस्ती दाखवू नका- शरद पवार

राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषीच; चौकशी करा समर्थन कधीच नाही

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राफेल डीलवरून नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याचे वृत्त होते. त्यानंतर शरद पवार यांच्यावर चांगलीच टीका झाली. नरेंद्र मोदी यांचे हेतू चुकीचे नाहीत असे त्यांनी म्हटले होते. तसेच राफेल प्रकरणी कॉंग्रेस करत असलेल्या मागण्यांबाबत पवारांनी प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. काँग्रेसच्या मागण्यांमध्ये काहीही औचित्य नसल्याचे आणि लोकांचा नरेंद्र मोदींवर विश्‍वास असल्याचे सांगितले होते.

-Ads-

दरम्यान, आज बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय संकल्प सभा आयोजित सभेत शरद पवारांनी राफेल प्रकरणावरून युटर्न घेतल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार म्हणाले, “६५० कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान १६०० कोटी रुपयांना विकत घेतलेच कसे, असा सवाल उपस्थित करत राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषी आहेच, त्यामुळे त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तर त्याची सर्वपक्षीय, संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी पवारांनी केली. तसेच तुमचे थोडेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सत्तेची मस्ती दाखवू नका, असा इशाराही त्यांनी सरकारसह बीड जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाला दिला.

बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील बागलाने मैदानावर आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. देशाचे पंतप्रधान मन की बात सांगतात, जन की बात मात्र सांगत नाहीत. शेतकरी, अल्पसंख्यांक, तरुणांची बात मात्र एेकून घेत नाहीत अशा शब्दांत मोदींच्या मन की बातची त्यांनी खिल्ली उडविली.

धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाचे काय झाले, असा प्रश्न विचारतानाच या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही अशा शब्दांत टोला लगावताना या सरकारला हबाडा दाखविल्याशिवाय आता गत्यंतर नसल्याचे ते म्हणाले.

आज सत्तेचा गैरवापर चालू आहे, संचालक नसतानाही आणि कर्जावर सही नसतानाही धनंजय मुंडेंना जगमित्र सुतगिरणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तडीपार केले जात आहेत. सत्तेचा हा गैरवापर करू नका, तुमचे थोडेच दिवस उरले आहेत असा इशारा त्यांनी सरकार आणि बीडच्या जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांनाही दिला.

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)