थेरगाव विद्यालयाला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे विभागाला विजेतेपद मिळवून दिले आहे.

बारामती येथे 15 ते 18 नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या स्पर्धेत 14 वर्षीय मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी सामन्यात पुणे विभागाचे नेतृत्व करत थेरगाव विद्यालयाच्या मुलींनी चमकदार कामगिरी करत अंतिम सामन्यात कोल्हापुरच्या संघावर 35-31 अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात भुमिका गोरे, रुपाली डोंगरे, तेजल महाजन यांनी उत्कृष्ट चढाया केल्या तर कोमल राठोड, सविता गवई, विद्या गायकवाड, निकीता माळी, व चांदणी गायकवाड यांच्या उत्तम पकडीमुळे संघाला विजेतेपद पटकाविता आले. या विजयात दियाश्री मांजरे, सलोनी सरदार, किर्ती कडगंजी, पूजा तेलंग या खेळाडूंनीही मोलाचे योगदान दिले.

विजयी संघातून भुमिका गोरे, रुपाली डोंगरे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाला प्रशिक्षक आटवे बन्सी गंगाराम यांचे मार्गदर्शन लाभले. तर संघाचे व्यवस्थापन सोनाली जाधव यांनी केले. कृष्णराव टकले, चंद्रशेखर कदम, संजय यादव, मंगेश दणाणे, अनिल आदींनी संघाला सहकार्य केले. नगरसेविका अर्चना बारणे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, मनिषा पवार, आशा राऊत, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, क्रीडा प्रशासनाधिकारी राजेश जगताप, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, मुख्याध्यापक एस. डी. शिंदे, तानाजी बारणे यांनी संघाचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
10 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)