थेरगाव येथे गतिरोधक बसविण्याची मागणी

थेरगाव – वाढत्या अपघाताचे प्रमाण पाहता थेरगाव येथील शिवकॉलनी कमानी चौक व खिंवसरा ट्रेडसमोरील दुभाजकाच्या दोन्ही बाजूस मोठे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी ह्युमन राईट्‌स असोसिएशन फॉर प्रोटेक्‍शनच्या वतीने करण्यात आली आहे.

संस्थेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन यांनी ड प्रभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे ही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शिवकॉलनी कमानी समोर व खिंवसरा ट्रेड सेंटर येथे जवळच प्रेरणा शिक्षण संस्था कांतीलाल खिंवसरा विद्यालय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या दोन्ही चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

या दोन्ही चौकातील दुभाजकाच्या दोन्ही बाजूस मोठे गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, पुणे जिल्हयाचे अध्यक्ष सुभाष कोठारी, पुणे जिल्हा निरिक्षक दिलीप टेकाळे, जिल्हा संघटक मुनीर शेख, पुणे कार्याध्यक्ष विकास कांबळे, पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष अविनाश रानवडे, पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष ओमकार शेरे, पिंपरी-चिंचवड शहराचे सचिव लक्ष्मण दवणे, सचिव पिंपरी-चिंचवड डॉ.सतीश नगरकर, ग प्रभागाचे सचिव प्रसाद देवळालीकर, ड प्रभागाचे अध्यक्ष जयवंत कुदळे, ड प्रभागाचे उपाध्यक्ष वैभव कादवाने, सचिव भास्कर घोरपडे, काळेवाडी शाखेचे अध्यक्ष सोहनलाल राठोड यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)