थेरगाव येथे एकास मारहाण

पिंपरी – घरगुती वादातून 45 वर्षीय इसमास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात इराण्णा करिअप्पा आचामट्टी (वय-45, रा. थेरगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. वासू मारुती आचामट्टी, सुरेश मारुती आचामट्टी (दोघे रा. थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण्णा यांचा त्यांच्या भावाशी घराच्या ताब्यावरुन वाद होता. यातील इराण्णा यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या भावजयीला घराचा ताबा दिला. यावेळी त्यांनी घरातील सामान बाहेर काढले व ते सामानाजवळ बसले असता आरोपींनी व त्यांच्या इतर दोन मित्रांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)