थेरगावात वर्षभरात चारच श्‍वान जेरबंद

पिंपरी – थेरगाव परिसरातील मोकाट श्‍वान पकडण्यासाठी महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाला अखेर 31 डिसेंबरचा मुहूर्त लाभला. अवघे चार श्‍वान पशू वैद्यकीय विभागाने पकडून नेले. महासभेत वारंवार आवाज उठवला, निवेदनांचा भडीमार करण्यात आला. मात्र, महापालिकेला वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुहूर्त लाभला याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अशा शब्दात स्थानिक नगरसेविका माया बारणे यांनी नाराजी व्यक्त केली.

शहरात मोकाट कुत्र्यांना पकडणे आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे काम महापालिकने खासगी एजन्सीला दिले आहे. मात्र हे काम करणाऱ्या खासगी एजन्सीच्या कार्यपध्दतीवर अनेकदा प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. थेरगाव परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मोकाट कुत्रे पकडण्याची मागणी वर्षभरापासून सातत्याने होत होती. महासभेतही यावर चर्चा झाली. तक्रार अर्ज देण्यात आले. मात्र, महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने त्याकडे कानाडोळा करण्याची भूमिका घेतली. अखेर वर्षाच्या शेवटच्या दिवशी पशू वैद्यकीय विभाग खडबडून जागा झाला. हा मुहूर्त गाठत थेरगाव परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. काही तासाच्या धावपळीनंतर पथकाने चार कुत्र्यांना जेरबंद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने डिसेंबर 2017 मध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी दोन एजन्सीची नेमणूक केली होती. यासाठी मुंबई येथील एस. टी. सी. ए. आणि ए. डब्ल्यु.ए. या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले होते. या दोन कंपन्यांपैकी एस. टी. सी. ए. कंपनीने आत्तापर्यंत 5 हजार 718 मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. यासाठी त्यांना महापालिकेने 33 लाख रुपये दिले आहेत. तर दुसरी कंपनी ए. डब्ल्यु. ए. या कंपनीने शहरातील 6 हजार 148 मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यासाठी त्यांना 34 लाख रुपये देण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्याचे काम जोरात चालु असल्याचे भासवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणच्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला नाही. थेरगावात अधिकच भयानक परिस्थिती आहे. कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी माया बारणे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)