थेरगावात युवकावर कोयत्याने वार

पिंपरी – जुन्या भांडणाचा राग मनात धरुन तसेच तू आमच्यासोबत का राहत नाहीस असे विचारत एका 17 वर्षांच्या युवकावर तीन जणांनी लोखंडी कोयत्याने वार केले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.29) थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ दुपारी तीन वाजता घडली.

राजू गायकवाड (वय 17, रा. थेरगाव) असे या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय लोंढे, राज खरात यांच्यासह एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वाकड पोलीस दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू व आरोपी यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती.

जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी संगनमताने राजूला अडवले आणि तू महाराजासोबत का राहतो, आमच्यासोबत का राहत नाहीस असे विचारत मोटरसायकलवरुन ढकलून दिले. शिवीगाळ करून बेदम मारहाण ही केली. राजूच्या डोक्‍यात लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)