थेरगावमध्ये शाळांसमोर बेकायदा “पार्किंग’

थेरगाव – मंगलनगर येथील शाळेच्या रस्त्यावर बेकायदेशीर चारचाकी वाहने उभी केली जातात. या वाहनांच्या आडोशाला प्रेमीयुगल विचित्र चाळे करत असतात. अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्‍शनचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन यांनी केली आहे.

यासंदर्भात पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, मंगलनगर येथे असलेल्या श्री कांतीलाल खिंवसरा इंग्लिश मिडियम स्कूल व पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेसमोर स्थानिक रहिवासी बेकायदेशीरपणे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. तसेच या वाहनांच्या अडोशाला प्रेमी युगल विचित्र चाळे करतात. टवाळखोर येथे वाहने उभी करुन दारु पित बसतात. त्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांचा याठिकाणचा वावर धोकादायक बनला आहे. याठिकाणी सायंकाळनंतर दोन ते तीन वेळा पेट्रोलियम करणारे पोलीस कर्मचारी पाठवावेत. येथील वाहनांवर कारवाई करावी. याठिकाणी नो पार्किंगचे फलक लावावेत, अशी मागणी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवेदन देतेवेळी संघटनेने महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष कोठारी, जिल्हा निरिक्षक दिलीप टेकाळे, संघटक मुनीर शेख, कार्याध्यक्ष विकास कांबळे, शहर कार्याध्यक्ष अविनाश रानवडे, उपाध्यक्ष ओमकार शेरे, सचिव लक्ष्मण दवणे, डॉ. सतीश नगरकर, मुनीर शेख, ग प्रभागाचे सचिव प्रसाद देवळालीकर, ड प्रभागाचे अध्यक्ष जयवंत कुदळे, ड प्रभागाचे उपाध्यक्ष वैभव कादवाने, सचिव भास्कर घोरपडे, काळेवाडी शाखेचे अध्यक्ष सोहनलाल राठोड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)