थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 2 लाख 73 हजार कोटीचे वितरण

महाराष्ट्रात 3 हजार कोटी रुपये लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात 

नवी दिल्ली – थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे आजपर्यंत देशात 2 लाख 73 हजार 183 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, तर महाराष्ट्रात 3 हजार 210 कोटींचा निधी “डीबीटी’द्वारे लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आला आहे.

-Ads-

विविध शासकीय योजनांचा लाभ देताना होणारी गळती थांबविण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना ( डीबीटी ) 2013 साली सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सध्या 56 मंत्रालयांच्या 410 योजनांचा निधी “डीबीटी’ द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत आहे. या योजनेमुळे गेल्या 4 वर्षात 57 हजार कोटींची बचत झाली आहे.

महाराष्ट्रात 3 हजार 210 कोटी “डीबीटी’ द्वारे वितरित
महाराष्ट्रात थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत 3 हजार 210 कोटी 13 लाख रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आला आहे. महाराष्ट्रात 18 लाख 35 हजार 364 लाभार्थ्यांना डिबीटी योजनेशी जोडण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी 13 लाख 30 हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अल्पसंख्याक विभागात 41,310 लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे, आदिवासी विकास विभागात 1 लाख 43 हजार, उच्च व तंत्र शिक्षण विभागात 3 लाख 8 हजार, शालेय शिक्षण विभागात 12 हजार 156 लाभार्थ्यांची नोंदणी आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने झाली आहे.

एका वर्षात 90 हजार कोटी “डीबीटी’ द्वारे वितरित
सन 2017-18 या आर्थिक वर्षात आजपर्यंत 90 हजार 240 कोटी 28 लाख रुपयांचा निधी डीबीटी च्या माध्यमातून 60 कोटी 45 लाख लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे 2013 -14 साली थेट लाभ हस्तांतरण योजनेशी केवळ 10 कोटी 81 लाख लाभार्थी जोडले गेले होते व त्यांना 7 हजार 367 कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता.

थेट लाभ हस्तांतरण: एक दृष्टिक्षेप
सन 2014 ते 2017- 18 या चार वर्षात थेट लाभ हस्तांतरण योजनेची व्याप्ती वाढली असून 2014-15 या वर्षात देशात 38 हजार 926 कोटींचा निधी 22 कोटी 82 लाख लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आला तर 2015 -16 या वर्षात 31 कोटी 25 लाख लाभार्थ्यांना 61 हजार 942 कोटी डीबीटी द्वारे वितरित करण्यात आले. सन 2016 -17 या वर्षात 74 हजार 707 कोटी रुपये 35 कोटी 7 लाख लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले तर 2017-18 या वर्षात 60 कोटी 45 लाख लाभार्थ्यांना 90 हजार 240 कोटी रुपये डीबीटी द्वारे वितरित करण्यात आले आहेत.

“डीबीटी’च्या माध्यमातून प्रामुख्याने गॅस सबसिडी, रोजगार हमी योजना, छात्रवृत्ती व शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय साहाय्य योजना, सामाजिक न्याय योजनांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)