थेट भेट!- जीवनगाणे

नेहमीप्रमाणे उधोजीराजांच्या सदरेवर धावपऴ चालू होती. अनेक ठिकाणी सरकारशी उघड उघड दोन हात करायचे ठरले असल्याने रोज नवनवीन बातम्या येत होत्या. काहीजण पेपरातील बातम्यांची जुळवाजुळव करत होते तर काही जण चॅनलवर चालू असलेल्या प्रतिक्रिया पाहात होते. मुळातच राजांच्या चुलत बंधूंनी थोरल्या साहेबांच्या हयातीत सवतासुभा उभा करून राज्यांमध्ये वेगळी चूल मांडली होती. अलीकडे त्यांचा प्रभाव थोडा कमी असला तरी सदा तटस्थ म्हणवून घेणाऱ्यांनी सरकारविरोधात शस्त्र उचलले होते.त्यांचा एकमेव मावळा प्रतिनिधीगृहात असल्याने एकंदरीत वजन कमी झाले होते पूर्वीच्या प्रतिनिधीगृहात त्यांचे तब्बल तेरा मावळे होते.

अलीकडेच त्यांच्या सरकारविरोधी वातावरणामुळे चुलतबंधू बहुदा ‘बारामतीच्या’ संपर्कात असून त्यांच्या समवेत जाणार असेच वाटत होते कारण आजकाल विरोधी आघाडीविरोधात या चुलत बंधूंचे काहीच वक्तव्य नव्हते. महाराष्ट्राच्या सुभेदाराविरोधात त्याने उघडउघड विरोधाची वर्दळ उठवली होती व कितीही नाही म्हटले तरी उधोजीराजे अजूनही सरकार समवेत असल्याने सरकारवर होणारे प्रत्येक वार अर्थात मुंबईचे सुभेदार व अप्रत्यक्षपणे राजे उधोजी यांच्यावर होत होता. अलीकडे त्या चुलत बंधूंनी उधोजी राजे व त्यांच्या वृत्तपत्रांवरही शरसंधान केले होते दोन्ही चुलत बंधूंचा वाद हळूहळू वाढतच होता. सामान्य जनतेच्या मनातही संभ्रम पडत होता की एकाच वटवृक्षाचा दोन फांद्या पूर्ण पणे वेगळ्या झाल्या होत्या. एक तप उलटले.एक फांदी तेवढीच डेरेदार होती पण दुसरी कमी पडत होती. असे असले तरी अलीकडेच दोन्ही चुलत बंधूचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप वाढत चालले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन्ही बंधूंचे सैनिक आपापसात काही वेळा भिडत होते व लढण्यास सज्ज होते. अशा वेळी अचानक चुलत बंधूंचे आगमन उधोजीराजांच्या सदरेवर होत आहे अशी आरोळी आली. गडावरील बुरुजांवरून दिसत होते की इंजिनधारी बंधूंच्या गाड्यांचा ताफा राजांच्या गडासमोर थांबला.पटापट सैनिक उतरले हातात शस्त्रे वगैरे नव्हती पण सर्व जण पटापट सदरेपाशी येऊ लागले. क्षणभर सदरेवर खळबळ उडाली. कुणी मावळे आपली हत्यारे कोठे आहे ते पाहू लागले. एवढ्यात उधोजीराजे स्वतः साध्या वेशात पुढे हजर झाले.क्षणात शस्त्रे शोधणाऱ्या डोळ्यांनी मुजरे झाडले व वर्दी दिली की आपले ‘राजगडावरील’ बंधू आपल्या भेटीस येथे येत आहेत. राजाने हसून हात वर केले व सर्वांना बाजूला उभे राहण्याची खूण केली.

क्षणार्धात बंधू सदरेवर हजर झाले दोघेही समोरासमोर. मावळ्यांना वाटले कि आता काय होणार इतक्‍या दोन्ही बंधूंनी गळाभेट केली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. चुलतबंधूंनी राजांना त्यांच्या युवराजांच्या विवाहाचे आवतणं केले. एवढ्याच कामासाठी ते सदरेवर आले होते. ही भेट अगदी खाजगी व व्यक्तिगत होती. ना राजकारण, ना त्यावर चर्चा. माफक चहापानाने भेट आटोपली व राजगडाचे बंधू निघूनही गेले.

त्याच वेळी सैनिकांतील दोन सैनिक जे सख्खे भाऊ होते ते समोरासमोर आले. एक उधोजींच्या सदरेवर तर दुसरे राजगडी. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. मग मनाशी विचार करू लागले. पक्ष फुटून एक तप उलटून गेले. दोघांनीही एकमेकांची घरे पूर्ण तोडून टाकली होती. ना येणे जाणे ना साधा फोन. . . .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)