थेट परकीय गुंतवणुकीसाठी आगामी काळ आशादायक

नवी दिल्ली: एप्रिल-जून तिमाहीदरम्यान विदेशी थेट गुंतवणुकीमध्ये 23 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली. गेल्या तिमाहीत ती 12.75 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असल्यामुळे आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. जून 2017-18 कालावधीत 10.4 अब्ज डॉलर्सची एफडीआय देशात आल्याचे औद्योगिक धोरण आणि प्रमोशन विभागाच्या आकडेवारीतून समजते. गेल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक सेवा क्षेत्रात करण्यात आली.

या क्षेत्रात एकूण 2.43 अब्ज डॉलर्स, ट्रेडिंग (1.62 अब्ज डॉलर्स), दूरसंचार (1.59 अब्ज डॉलर्स), संगणकीय सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर (1.4 अब्ज डॉलर्स), पॉवर क्षेत्रात 969 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक आली. सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये सिंगापूर (6.52 अब्ज डॉलर्स), मॉरिशस (1.5 अब्ज डॉलर्स), जपान (874 दशलक्ष डॉलर्स), ब्रिटनमधून 648 दशलक्ष डॉलर्स व अमेरिकेतून 348 दशलक्ष डॉलर्सची
गुंतवणूक आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)