थेट पद्धतीने शालेय साहित्य खरेदी

पिंपरी – महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक शालेय साहित्य थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी दरवाढ न करता चार पुरवठादारांकडून गेल्या वर्षींच्या लघुत्तम दराने खरेदी केली जाणार आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वह्या, पावसाळी साधने अर्थात रेनकोट, दप्तरे, बालवाडी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रयोगवही, भूगोल नकाशावही, चित्रकला वही, व्यावसायमाला, स्वाध्यायमाला, माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त विविध उपक्रमांतर्गत प्रयोगवही, भूगोल नकाशावही, चित्रकला वही, अन्य नोंदवह्या खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, त्यांची गैरसोय होवू नये, तसेच 15 जूनपासूनच शालेय साहित्य पुरविणे आवश्‍यक असल्याने जुन्या पुरवठादारांकडूनच हे शालेय साहित्य खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वह्या चाकण येथील मेसर्स सनराज प्रिंटपॅक इंडस्ट्रीजकडून, रेनकोट मुंबईच्या मेसर्स सुपर प्लास्टिक कॉर्पोरेशनकडून, दप्तरे मुंबईच्याच मेसर्स लकी प्लास्टिक कंपनीकडून, तर बालवाडी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रयोगवही, भूगोल नकाशावही, चित्रकला वही, व्यावसायमाला, स्वाध्यायमाला, तसेच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त विविध उपक्रमांतर्गत प्रयोगवही, भूगोल नकाशावही, चित्रकला वही, अन्य नोंदवह्या पुण्यातील कौसल्या पब्लिकेशनकडून खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारची दरवाढ न करता गतवर्षींच्या लघुत्तम दराने हे साहित्य घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)