थेट निवडून आलेल्या सरपंचालाही मतदानाचा अधिकार

अब्दूलाट ग्रामपंचायतीची उपसरपंच निवडणूक नव्याने घेण्याचे आदेश

मुंबई: उपसरपंचाच्या निवडणूकीत थेट निवडून आलेल्या सरपंचाला सदस्य म्हूणन मत देण्याचा आणि समान मते पडल्यास दुसरे मत देण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. हा निर्वाळा देताना कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालूक्‍यातील अब्दूलाट ग्रामपंचायतीची उपसरपंच निवडणूक रद्द करून पुन्हा नव्याने घेण्याचे आदेश दिले.

ग्रामविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या सरपंचाला उपसरपंचाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मतदान करण्यास मनाई करण्यात आली. या निर्णयामुळे शिरोळ तालुक्‍यातील अब्दूलाट ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणूकीत कल्लपा कुमटोळे यांचा एक मतानी पराभव पत्करावा लागला. या निर्णया विरोधात सरपंच पांडूरंग मोरे आणि कल्लपा कुमटोळे यांच्यावतीने ऍड. धैर्यशिल सुतार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ऍड. धैर्यशिल सुतार यांनी थेट सरपंच म्हणून निवडून आलेली व्यक्ती ही ग्रामपंचायत सदस्य असल्याने तिला उपसरपंपदाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून मतदान करण्याचा अधिकार असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच या निवडणुकीत समान मते पडल्यास निर्णयाक म्हणून दुसरे मत देण्याचा अधिकार सरपंचाला आहे, असा दावा केला. हा दावा न्यायालयाने यापूर्वी न्यायालयाच्या निर्णयानुसार मान्य करून उपसरपंच पदाची निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)