काबुल – अफगाणिस्तानच्या भूमीत जो पर्यंत विदेशी घुसखोर कायम आहेत तो पर्यंत अफगाणिस्तान सरकारशी शांततेबाबत कोणतीही चर्चा केली जाणार नाही आणि या देशात शांतताही टिकवू दिली जाणार नाही अशी आडमुठी भूमिका तालिबान संघटनेने पुन्हा एकदा घेतली आहे.

शांतता प्रक्रियेबाबत चर्चा करायचीच असेल तर ती आम्ही थेट अमेरिकेशीच करू असेही त्यांनी म्हटले आहे. ईद उल अधानिमीत्ता मौलवी हैबतुल्लाहे अखुंजादा यांनी जो संदेश जारी केला आहे त्यात त्यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे. आमची इस्लामिक धोरणे आणि लक्ष्यही कायम आहे त्यातही बदल होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तालिबानी गनिमांच्या हिंसक कारवायांमुळे अफगाणिस्तानात गेली 17 वर्षे कमालीची अस्थिरता आणि मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)