थेऊर येथील गॅस एजन्सीत चोरी ; सीसीटीव्हीत चोरटे कैद 

रोख रक्कम पळविली

थेऊर: गॅस एजन्सीचे शटर उचकटून चार चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख 7 हजार 144 रुपये चोरून नेल्याची घटना घडली असून चोरटे सीसीटिव्ही मध्ये कैद झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.6) रात्री घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चोरी प्रकरणी अमोल तात्यासाहेब काळे (रा. भिमनगर जवळ, थेऊर) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, थेऊर येथे अमोल काळे यांची गॅस एजन्सी असून तेथे जमा होणारी रक्कम ते दोन टप्प्यांत बॅंकेत भरतात. सोमवारी (दि.6) जमा झालेली रक्कम एजन्सीचे व्यवस्थापक गायकवाड यांनी सकाळी 10:30च्या सुमारास बॅंकेत जमा केली, त्यानंतर दिवसभर जमा झालेल्या रक्कमेचा भरणा दुपारी 3:30च्या सुमारास बॅंकेत केला, त्यानंतर जमा झालेली एक लाख 7 हजार 144 रुपयांची रक्कम त्यांनी मोजून गॅस एजन्सी कार्यालयातील ड्रॉवर मध्ये ठेवली.

एजन्सी सायंकाळी नेहमीप्रमाणे 07:30च्या सुमारास बंद केली. मंगळवारी (दि. 7) 08:00च्या सुमारास नेहमीप्रमाणे एजन्सी उघडण्यास काळे गेले, त्यावेळी त्यांना कार्यालयाचे लोखंडी शटर अर्धवट उघडे असलेले दिसले, त्यांनी आत जाऊन पाहले असता कार्यालयातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले व पैसे ठेवलेले ड्रॉवर उघडे तसेच त्यांत ठेवलेली रक्कम नसल्याचे निदर्शनास आले. सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले, यातून त्यांनी चार चोरट्यांविरोधांत फिर्याद दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)