थेऊर मंडलाधिकारपदी चंद्रशेखर दगडे, उरुळी कांचनला दीपक चव्हाण

थेऊर – येथील मंडलाधिकारी हरिदास चाटे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी चंद्रशेखर दगडे यांनी थेऊर मंडल अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. दगडे यांनी यापूर्वी पुरंदर तालुका पुरवठा निरीक्षक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. थेऊर मंडलाधिकारी कार्यालयांतर्गत कोलवडी, साष्टे, मांजरी बुद्रुक, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती आदी महसुली गावांचा समावेश आहे.
उरुळी कांचनचे मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांची वाघोली मंडलाधिकारी म्हणून बदली झाल्याने दीपक चव्हाण यांनी उरुळी कांचनचे मंडल अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. चव्हाण हे पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष असून त्यांनी करमणूक कर शाखेत शासनाला महसूल वाढ करून देण्यास योग्य भूमिका बजावली आहे. ऊरुळीकांचन मंडलाधिकारी कार्यालयांतर्गत खामगांव, नायगांव, पेठ, सोरतापवाडी, शिंदवणे, भवरापूर, हिंगणगाव, अष्टापूर आणि कोरेगाव मूळ इत्यादी महसूली गावांचा समावेश आहे.
हवेली तालुका तहसील कार्यालयातील कुळ कायदा विभागाचे अव्वल कारकून अरुण पिसे यांची शिरुर तालुक्‍यात बदली झाल्याने रिक्त असलेल्या त्यांच्या जागी विजय चांदगुडे यांनी पदभार स्वीकारला आहे. चांदगुडे यांनी यापूर्वी पुरंदर तालुक्‍यात अव्वल कारकून म्हणून चांगली कामगिरी बजावली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)