थॅलसेमिया आजाराबाबत जागृती होणे गरजेचे : आमदार कोल्हे

कोपरगाव: आरोग्यशास्त्र प्रगत झाले असून, भविष्यात आपल्या पुढील पिढीच्या सुदृढता व सुरक्षिततेसाठी थॅलसेमिया आजारचे निदान करणे गरजेचे आहे. माता-पित्यांना हा आजार असल्यास त्यांच्या होणाऱ्या मुलालाही हा आजार होतो. त्यामुळे या बाळाच्या अंगात रक्त तयार होऊ शकत नाही. त्यामुळे त्याला बाहेरून रक्त पुरवावे लागते. त्यामुळे थॅलसेमियाची जागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स आणि नगर येथील ऋतुजा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी शैक्षणिक संकुलाच्या 5 हजार 224 विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची थॅलसेमिया मायनर, रक्तातील हिमामग्लोबिन आणि रक्त गट तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे तो एक जागतिक उच्चांक झाला आहे. ग्लोबल रेकॉर्डस ऍण्ड रिसर्च फाऊंडेशनचे भारतातील अध्यक्ष मनमोहन रावत व निवाडा अधिकारी सुबोध रावत यांनी या जागतिक उपक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमास आ. कोल्हे यांनी भेट दिली असता त्या बोलत होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्‍वस्त सुमित कोल्हे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनीही शिबिरास भेट दिली. उपक्रमास फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. अंजली केवल, विश्‍वजित नरवडे, शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशनचे प्रतिनिधी घाणेकर, सकाळ फाऊंडेशन आणि कोपरगावच्या संजीवनी ब्लड बॅंकेच्या संचालिका नीता पाटील यांनी मोलाची साथ दिली. नितीन कोल्हे म्हणाले, मुला-मुलींच्या विवाहाप्रसंगी पत्रिका पाहिली जाते. परंतु आता ते थॅलसेमियाचे मायनर रुग्न नाहीत ना, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)