थुकरटवाडीत सज्ज होणार ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील कलाकार

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

थुकरटवाडीत ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील कलाकारांची फौज सज्ज होणार आहे. प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, सविता मालपेकर, क्षितिज दाते आणि इतर कलाकार थुकरट वाडीत हजर असल्यावर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चला हवा हवा येऊ द्या मधील विनोदवीर दमदार स्क्रिप्ट सादर करणार यात शंकाच नाही. निलेश साबळे यांचा प्रवीण तरडे साकारण्यात हातखंडा आहे हे सर्व महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे प्रवीण तरडे थुकरट वाडीत आल्यावर निलेश साबळे याने ‘खतरनाक’ प्रवीण तरडे साकारला, त्यामुळे प्रेक्षक हसून लोटपोट होणार हे नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)