थुंकी बहाद्दरांना रोखण्यासाठी आता पानटपरी “टार्गेट’

दोन दिवसांत 476 जणांकडून 60 हजारांचा दंड वसूल

पुणे – रस्त्यावरील थुंकी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा उभारल्यानंतर महापालिकेने आता आपला मोर्चा शहरातील पानटपरीवाल्यांवर वळविला आहे. बुधवारपासून 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या टपऱ्यांच्या परिसरात गस्त राहणार असून “पान अथवा तंबाखूजन्य पदार्थ खावून थुंकू नये,’ अशा सूचना टपरी चालकांना देण्यात आल्या आहेत.

-Ads-

एखाद्या टपरीच्या परिसरात एखादा नागरिक थुंकल्यास आणि त्याला टपरीचालकाने मज्जाव न केल्यास त्या स्वच्छतेची जबाबदारी टपरी चालकावर असणार आहे.

रस्त्यावर पिचकाऱ्या मारून रस्ते घाण करणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई आणि त्यांच्याकडूनच रस्त्याची सफाई करून घेण्याची मोहीम हाती घेतली असली, तरी अशा महाभागांचा आकडा वाढतच असल्याचे चित्र आहे. महापालिकेने शहरात बुधवारी आणखी 79 जणांवर कारवाई केली आहे.

गेल्या काही दिवसांत रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महत्त्वाच्या चौकांत पालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 476 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून त्यांच्याकडून 60 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, हे प्रमाण वाढतच असल्याने शहरातील प्रमुख तसेच गर्दीची पानाची दुकाने महापालिकेच्या कारवाईच्या रडारवर असणार आहेत. त्यासाठी उद्यापासून अशा टपऱ्यांच्या आसपास कारवाई करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढलेले आहेत. टपरीच्या परिसरात सूचना फलक लावले जाणार नाहीत, तसेच त्यांच्याकडून थुंकण्यासाठी पिंकदानी दिली जाणार नाही, त्यांना जबाबदार धरून रस्ता स्वच्छ करायला लावला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)