थुंकीबहाद्दरांवर कारवाई टाळणे भोवले

तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांना नोटीस

पुणे – रस्ता तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 15 पथके तयार करून कारवाई सुरू केली आहे. मात्र, पालिकेच्या 3 क्षेत्रीय कार्यालयांकडून काहीच कारवाई झालेली नाही. यातील कामचुकार सहायक आरोग्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

-Ads-

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून भवानीपेठ, हडपसर तसेच ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे हे कर्मचारी आहेत. दरम्यान, पालिकेने सुरू केलेल्या या कारवाईचा आकडा 1 हजारावर गेला असून आतापर्यंत पालिकेने 1 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

रस्त्यावर थुंकणाऱ्या तसेच अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यात प्रमुख चौकांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून स्वच्छता करून घेण्यासह तसेच दंडही वसूल केला जात आहे. मात्र, काही मोजक्‍याच क्षेत्रीय कार्यालयांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या आरोग्य निरीक्षकांची बैठक घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, ढोले-पाटील रस्ता, हडपसर, तसेच भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून अजून कोणतीही कार्यवाही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्याचे मोळक यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)