थुंकले ग्राहक, सफाई केली टपरीवाल्यांनी!

पुणे – थुंकीबहाद्दरांना आळा घालण्यासाठी महापालिकेने बुधवारपासून पानटपरी परिसरात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ज्या पानटपऱ्यांच्या परिसरात तसेच त्यासमोरच्या रस्त्यावर थुंकण्यात आले आहे, त्याची स्वच्छता चक्क टपरीवाल्यांकडून घेण्यात आली आहे.

महापालिकेच्या या कारवाईचा धसका टपरीवाल्यांनीही घेतला असून टपरी बाहेर ग्राहकांना थुंकण्यासाठी प्रत्येकी दोन थुंकदाण्या ठेवण्यात आल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांत रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महत्त्वाच्या चौकांत पालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 600 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, हे प्रमाण वाढतच असल्याने शहरातील प्रमुख तसेच गर्दीच्या पानदुकांनावर कारवाईचा रोख वळविण्यात आला. त्या अंतर्गत 15 क्षेत्रीय कार्यालयांनी एकाच वेळी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली असून बुधवारी सर्वाधिक 286 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 65 हजार 685 रुपयांचा दंड वसूल केल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. तर एकूण कारवाईचा आकडा 762 वर गेला असून 1 लाख 25 हजार रूपयांच्या दंडाची वसुली झाली आहे.

-Ads-

टपऱ्यावर आल्या थुंकदाण्या
महापालिकेने ग्राहक रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकून गेल्याने त्याची जबाबदारी टपरीचालकावर निश्‍चित केल्याने टपरी चालकांनी दुकानांच्या बाहेर प्रत्येकी दोन थुंकदाण्या लावल्या आहेत. तर, ज्या ठिकाणी थुंकलेले आढळून आले, तेथे टपरीचालक आणि सोबत ग्राहकाला स्वच्छता करण्यास लावण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)