आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निर्णय
बॅंकॉक – थायलंडमध्ये 2014 नंतर प्रथमच राजकिय पक्षांना त्यांच्या पक्षात सदस्यांना भरती करुन घेणे अथवा पक्षातील पदांमध्ये बदल करण्याची मुभा देण्यात आली असून आगामी निवडणुकीदरम्यान इतर राजकीय हालचालींना बंदी घालण्यात आली आहे.

थायलंडमध्ये चार वर्षांपूर्वी सैन्याने सर्व देशाची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालत पक्षांच्या कार्यक्रमांवर देखिल बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर प्रथमच राजकीय पक्षांवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. या संदर्भात रॉयल गॅझेट या स्थानिक वर्तमानपत्रात बंदीवरुन निर्बंध हटविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पक्षांना आता किमान 250 सदस्यांना पद वाटप करण्यासोबतच त्यांचे नेते निवडणे, नवीन सदस्यांची भरती करणे, शाखा कार्यालये स्थापन करणे आणि सर्वसाधारण पक्षाच्या बैठकींचे आयोजन करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. मात्र पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर आणि प्रचार सभा घेण्यावर बंदी असणार आहे.

राजकीय पक्ष आपल्या सदस्यांशी इलेक्‍ट्रॉनिकरित्या संपर्क करू शकतात. परंतु त्या प्रकारच्या संपर्कास राजकीय मोहिमेचा एक प्रकार म्हणून मानले जाऊ नये, असे म्हटले आहे. या संदर्भात नॅशनल कौन्सिल फॉर पीस ऍण्ड ऑर्डर (एनसीपीओ) आणि निवडणूक आयोग संबंधीत प्रकरणी कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही अथवा झाले नाही, याची तपासणी करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)