थायलंडच्या निवडणूकीच्या निकालांबाबत उत्सुकता वाढली 

बॅंकॉक – थायलंडमध्ये 2014 साली झालेल्या बंडानंतर प्रथमच झालेल्या निवडणूकीच्या निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. थायलंडच्या सत्तास्थानी असलेल्या लष्करी राजकीय गटाकडून सत्ता कायम ठेवली जाईल, असे म्हटले जात आहे. देशात प्रमुख विरोधी पक्षांचे प्राबल्य कमी आहे. पण तरिही नवीन लोकशाहीवादी पक्षांचा उदय झाला आहे. या निवडणूकीचा निकाल सोमवारी दुपारपर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र निवडणूक आयोगाने कोणत्याही कारणाशिवाय निकाल जाहीर करण्यास उशीर केल्यामुळे या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मतमोजणीमध्ये गैरप्रकार झाल्याच्या काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे हा निकाल रोखून धरण्यात आला होता, असे बोलले जात आहे. थायलंडमधील निवडणूकीमध्ये तब्बल 93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र 1.9 दशलक्ष मते अवैध ठरली, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. थायलंडमधील काही निवडक प्रांतातील निम्म्याहून अधिक मतपेट्यांमधील मते अवैध असल्याचे प्राथमिक मोजणीदरम्यान निष्पन्न झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने आगोदर जाहीर केलेले काही मतदारसंघांमधील विजयाचे निकाल मागे घेतले.

रविवारी झालेले मतदान हे लष्करी शासनाच्या जागेवर सनदी शासनाच्या नियुक्‍तीसाठी घेतलेले सार्वमत होते. 2014 च्या बंडाचे नेते आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार प्रायुत चान ओ चा हे मतमोजणीमध्ये आघाडीवर असल्याचे दिसले होते. “जुंटा’चे नेते आणि त्माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्या पक्षाचे नेते फियु थाई यांच्यापेक्षा प्रायुत यांना मोठी आघाडी मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. फियु थाई यांनी लष्करी शासनापेक्षा सनदी लोकशाहीचा मार्ग निवडला असला, तरी मतमोजणीत ते पिछाडीवरच आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)